नगर परिषद पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक निविरोध

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : नगर परिषद नगरपथविक्रेता समिती सदस्यांची आठ सदस्य करीता होणारी निवडणूक निविरोध झाली आहे.पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण व पथ विक्री विनियमन अधिनियम – २०१४ अंतर्गत नियम ११ (२) (ख-एक) अन्वये पथ विक्रेत्याची निवडणूक नगर परिषद ने जाहीर केले होते. आठ सदस्य करीता सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) (महिला राखीव १) – ३, अनूसूचित जाती (महिला राखीव) – १, अनूसूचित जमाती (महिला राखीव) १, इतर मागासवर्ग – १, अल्पसंख्याक १, व विकलांग/दिव्यांग – १ करीता ९ जुलै ला निवडणूक होणार होती. पण ८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यामुळे ही निवडणूक निविरोध झाली.त्या मध्ये सदस्य जयश्री दिलीप ओंकार अनुसूचित जाती (महिला राखीव), मोहम्मद तनवीर मोहम्मद इस्माईल मलिक अल्पसंख्याक, नरेश दुर्योधन डोंगरे सर्वसाधारण-खुला प्रवर्ग, ऋषी वामनराव भोयर इतर मागासवर्ग, सुरेश संभा गुरुकुटावार विकलांग / दिव्यांग, ऊर्मिला राजेंद्र किरसान अनुसूचित जमाती (महिला राखीव), उमा शेषराव हांडे सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला राखीव), वसीम अहेमद अब्दुल सलाम सर्वसाधरण – (खुला प्रवर्ग) यांना निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी विजयी घोषित केले.विजयी सदस्यांना मुख्याधिकारी विशाल वाघ, उप मुख्याधिकारी जयवंत काटकर यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पल्लवी जयपूरकर डे एनयूएलएम व्यवस्थापक यांनी निवडणूक कार्यात सहकार्य केले.

CLICK TO SHARE