रामटेक चे अक्षय भिलकर यांना वीरमरण

देश

कर्नाटकात घडली दुर्दैवी घटना

प्रतिनिधी:इमरान मालधारी रामटेक

रामटेक:भारतीय लष्करात असलेल्या रामटेकच्या अक्षय अशोक भिलकर यांना कर्नाटकात प्रशिक्षण दरम्यान वीरमरण आले ते जम्मू काश्मीर ला तैनात होते पण त्यांचे तीन महिन्याचे प्रशिक्षण बेलगाम कर्नाटक येथे सुरू होते याच प्रशिक्षण काळात झालेल्या अपघातात अक्षय अशोक भिलकर यांना वीरमरण आले रामटेक येथील मुळ निवासी अक्षय अशोक भिलकर सात वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते भिलकर कुटुंबातील एकुलता एक मुलगा असतांनाही अक्षयने देश सेवेला प्राधान्य दिले त्यानुसार कठोर मेहनतीच्या बळावर अक्षय भिलकर यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला ते जम्मू काश्मीरात कर्तव्यावर होते पण काही दिवसा पूर्वी त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांना बेलगाम कर्नाटकात पाठवण्यात आले त्यांच्या मागे आई वडील तीन बहिणी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटने मुळे संपूर्ण रामटेक शहरात शोककळा पसरली आहे.

CLICK TO SHARE