चंद्रपूर रघुवंशी काॅमफ्लेक्समध्ये दुसऱ्यांदा गोळीबार

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी काॅमफ्लेक्समध्ये आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली.अमन अंधेवार असे जखमी व्यक्तीचे नाव आहे या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.त्याना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. सविस्तर वूत्त असे की, चंद्रपूर शहरातील आझाद बगीच्या जवळ असलेल्या रघुवंशी काॅमफ्लेक्समध्ये मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे.४ जुलैला दुपारी एक वाजता च्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी काॅमफ्लेक्सच्या लिफ्टजवळ आले.तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वी त्यांच्या मागुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळी त्यांच्या पाठीला लागली असल्याने ते जखमी झाले. चंद्रपूरात प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले.घटनास्तळी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व त्यांची टीम पोहचली असुन घटनेचा तपास सुरू आहे.

CLICK TO SHARE