न.प.कामगार सोसायटी निवडणूकीत अध्यक्षपदी राजेंद्र बाराहाते व सचिव श्याम परसुटकर यांची बिनविरोध निवड

चुनाव

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषद कर्मचारी सहकारी संस्था ची निवडणूक सन २०२३- २४ ते २०२८-२९ बिनविरोध झाली.सदर निवडणुकीचे कामकाज पी. आईसीसीआर. सारडा तालुका सहकारी निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक अधिकारी बल्लारपूर यांनी बघितले.बल्लारपूर नगरपरिषद कामगार सहकारी संस्थेची लाखो रुपयांची उलाढाल आहे. ही संस्था शहरातील सर्वात मोठी सहकारी संस्था मानली जाते. निवडणुकीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच कार्यकारिणीची निवड करण्यात आली.या निवडणुकीत राजेंद्र कचरुजी बारहाते यांची एकामताने अध्यक्षपदी निवड झाली उपाध्यक्षपदी संगीता उमरे यांची तर सचिवपदी श्यामसुंदर परसुटकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अब्दुल रशीद अब्दुल रजाक, थापा तेज बहादुर जयसिंग,नरेश गेडाम, प्रशांत बडघरे, शब्बीर अली, शंकर तांडा, मल्लेश कुप्पलवार, रीना बहोत यांच्यासह निवडुन आले.

CLICK TO SHARE