मयुर उमरक यांची आगळी वेगळी दिवाळी साजरी

सोशल

अनाथ उईके भगिणी सोबत मयूर उमरकर यांनी केली दिवाळी साजरी.

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

जलालखेडा (तं.13) मयूर उमरकर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली असून त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. कोरोना मध्ये मायेचे छत्र हरवलेल्या रामपुरी येथील उईके भगिनी यांना आपल्या नागपूर येथील निवस्थानी सन्मानाने आणून त्यांच्या सोबत उमरकर परिवाराने दिवाळी साजरी केली आहे. मागील वर्षी उमरकर यानी अनिल देशमुख गुन्हा नसताना तुरुंगात असल्यामुळे घरी दिवाळी साजरी केली नाही.यावर्षी मात्र रामपुरी येथील उईके भगिनींना घरी नेऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. जगात अनेक दुःखी परिवार आहे. त्यांच्या दुःखाची जान राखणारे या जगात खूप कमी माणसे आपल्याला मिळतील. त्यात मयूर उमरकर यांनी गरिबांच्या दुःखाची जाणीव ठेवत आई वडिलांचे छत्र हरवलेल्या भगिनी सोबत दिवाळी साजरी करत त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना काळात या मुलींचे आई व वडील हे दोघेही मृत्यू पावले अनेक राजकीय लोकांनी भेटी दिल्या बऱ्याच जणांनी हळहळ व्यक्त खेली मात्र मदतीला मात्र कुणीही पुढं आलं नाही अश्यातच मात्र सुरवातीपासून आजपर्यंत मयूर उमरकर मात्र सतत मदत करत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळवून देण्यात व त्यांच्या शिक्षणाचा खर्च मयूर उमरकर करीत आहे. प्रत्येकाने होईल तितकी मदत गरीबांना करायला हवी असे आव्हान यावेळी मयूर उमरकर यांनी केले आहे.उईके भगिनी सोबत दिवाळी साजरी करताना मयूर उमरकर व परिवार.आमची जगण्याची आशा स्मपल्यासारखं वाटायचं पण मयूर उमरकर आमच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहिला आणि आणि सतत मदतीला धावत असतो त्यामुळे आमची जगण्याची आशा द्विगुणीत झाली आहे.

CLICK TO SHARE