यशवंत प्राथमिक शाळा अल्लिपुरयेथे पालक सभा संपन्न

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

आज दि.06/07/2024 रोजी शनिवार ला यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर येथे पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला नंदूरकर मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून अल्लीपुर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विठ्ठलराव तपासे साहेब, सौ. ढोकणे मॅडम(प्राचार्या यशवंत विद्यालय अल्लीपुर ),कु. वनिता कोपरकर मॅडम(जेष्ठ शिक्षिका यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर) हे उपस्थित होते. सर्वात प्रथम स्व. बापुरावजी उर्फ दाआजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. पालक सभेमध्ये गणवेश, उपस्थिती, होमवर्क, शालेय अभ्यासक्रम ,गुणवत्ता, कप-बुलबुल पथक याबाबत सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.कब बुलबुल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री पाटील सरांचे सहकार्य लाभले.यावेळी आरोग्य विभागामार्फत आरोग्यसेविका बहादूरे मॅडम, मारशेट्टीवार सर यांनी पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नागरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. काळे सर यांनी केले. या सभेला शाळेतील सर्व शिक्षक व माता-पालक उपस्थित होते.

CLICK TO SHARE