शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता आता वेळा वासीयांचा एल्गार

एज्युकेशन

८ जुलै रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चाचे आयोजन

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

वेळा :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समितीची पत्रकार परिषदेत माहिती हिंगणघाट दि.६ जुलै मल कन्स्ट्रक्शनने दानस्वरूपात दिलेल्या वेळा येथील ४० एकर जागेवरच शासकीय महाविद्यालय उभारण्यात यावे,या मागणीसाठी आता वेळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समितीवतीने एल्गार पुकारला. येत्या ८ जुलै रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयावर एका विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत वेळा येथील संरक्षण समितीचे पदाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चा प्रस्ताव मंजूर केला. त्यामध्ये वर्धा जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट तालुक्याला देण्याचा ठराव मंजूर झाला. महाविद्यालय बांधण्याकरिता वेळा येथील साखर कारखाना या जागेचा प्रस्ताव तज्ञ समित्यांनी सर्व निकषाच्या आधारावर अभ्यास पूर्ण पद्धतीने पाठवला आहे. वर्धेचे जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारामार्फत यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाचे परिसरात फक्त ३.६५ म्हणजे ९ एकर जमीन शिल्लक आहे परंतु तालुका क्रीडा संकुल करिता त्या जमिनीची मागणी देखील करण्यात आली आहे. येथील वास्तविकता लक्षात न घेत महाविकास आघाडीच्या राजकारण्यांचा विरोध हा ग्रामीण विकास धोरणा विरुद्ध असल्याचा दिसून येत आहे तसेच ग्रामीण व शहरी असा वाद निर्माण करणारा आहे ही बाब तीव्र निषेधार्ह असल्याचं मनोगत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा ही समिती वेळा येथील प्रस्तावित जागेचा विरोध करणाऱ्या राजकारण्यांचा, ग्रामीण विकास व विकास विरोधी राजकारणाचा निषेध करत आहे. त्याकरिता सोमवार दि. ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कारंजा चौक – विठोबा चौक –डॉ. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर “हक्काचा लढा” म्हणून संबोधित जनसामान्याचा हा मोर्चा धडकणार आहे. मोर्चाचे समापन झाल्यानंतर लगेच धरणे आंदोलनाला बसणार. मेडिकल कॉलेज करिता एक रुपयात ४० एकर जमीन दान करणाऱ्या मल कन्स्ट्रक्शन यांना देखील संरक्षण समिती भेट घेऊन विनंती प्रस्ताव सादर करतील. तसेच एक शिष्ट मंडळ राज्य अधिवेशनात जाऊन मागणीचा पाठपुरावा करण्याकरिता निवेदन सादर करणार आहेत तसेच १२ जुलैच्या आत जर याचा सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर चक्काजाम आंदोलन, रेल रोको आंदोलन अशा आक्रमक भूमिका घेतली.यात समस्त ग्रामीण तसेच शहरातील समर्थन देणारे नागरीकसुद्धा सहभागी होतील. पुढील येणाऱ्या काही दिवसात संरक्षण समिती ग्रामीण विकास अभियान अंतर्गत जन आंदोलन उभ करून लढा तीव्र करनार असा इशारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संरक्षण समिती वेळा यांच्या वतीने देण्यात आला आहे. या दरम्यान मल कन्स्ट्रक्शन,नागपूर यांनी मात्र हा प्रस्ताव मागे घेतला असल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेला महेश मुडे,चंदू बोरकर,गुणवंत कामडी,प्रफुल बेले , टिकाराम नौकरकर ,वैभव बालपांडे ,अंकुश सायंकार ,सौरभ भुते ,शुभम गोटे,प्रकाश पानबूडे ,पप्पू करपे ,योगेश चौधरी,प्रविण काळे,अमित क्षिरसागर आदी उपस्थित होते.

CLICK TO SHARE