मोर्शी तालुक्यातील भिवकुंडी येथे बिरसा क्रांती दलाचे बैठक

अन्य

प्रतिनिधि:रवी वाहणे शेदूर्जनाघाट

अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायण उईके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची बैठक पार पडली. भिवकुंडी शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून राहुल भलावी तर महिला फोरम शाखाध्यक्षपदी राजकन्या मरसकोल्हे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या बैठकीला प्रा. कमलनारायण उईके यांनी विस्तृत असे मार्गदर्शन केले. बिरसा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा गावागावांमध्ये व समाजामध्ये बिरसा क्रांती दलाच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम बिरसा क्रांती दल करत आहे. येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला सामाजिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम बिरसा क्रांती दल करणार असल्याचे प्रा. कमलनारायण उईके म्हणाले.* *यावेळी बिरसा क्रांती दलाचे वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके, मोर्शी तालुकाध्यक्ष जयकिशन धुर्वे, मोर्शी शहराध्यक्ष रवी परतेती, मोर्शी तालुका पदाधिकारी विजय सिरसाम, शरद भलावी, प्रशांत सर्याम, राहुल पंडागळे, ॲड. योगेश नागले, वरुड तालुका संपर्कप्रमुख विनोद धुर्वे, तालुका कोषाध्यक्ष नितेश उईके, तालुका सहसंघटक संजय युवनाते, राजेश धुर्वे व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

CLICK TO SHARE