बल्लारपूर शहरातिल प्रसिद्ध कापड व्यावसायिक मालु यांचा दुकानावर गोळीबार,दुकानातील कामगार जखमी

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : शहरात वस्ती विभागात एका दुकानात गोळीबारी व बॉम्ब टाकून जाळण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली असून गोळीबारात एक जण जखमी झाले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.वस्ती विभागातील मालू बंधूचे सर्वात जुनी मोतीलाल प्रभुलाल मालू कपड्याचे दुकान असून आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अभिषेक मालू यांनी दुकान उघडताच काही वेळाने अज्ञात तीन इसमांनी मोपेड वर येऊन ३ फेऱ्या गोळीबार करीत दोन बॉम्ब फेकून दुकान जाळण्याचे प्रयत्न केले. या गोळीबारात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर (२५) यांचा पायाला गोळी लागली असून त्याला उपचार्थ चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. .गोळीबार झाल्याने वस्ती विभागात घबराट निर्माण झाली असून दुकानदारांनी आप आपले दुकान बंद करून आरोपींना पकडण्याची मागणी करत आहेत.मागील महिन्यात सुद्धा तिन इसमांनी अभिषेक मालु यांच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले होते.

CLICK TO SHARE