प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते स्विकारला राष्ट्रवादीचा शेला
हिंगणघाट शहरात वाढतोय राष्ट्रवादीचा जनार्धार
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरातील ऑटोचालक, मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश सोहळ्याला तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वाहतूक शेखर जाधव, जिल्हा सचिव हेमंत घोडे, जिल्हा उपाध्यक्ष अन्सार बेग, जितू रघाटाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन आज दि.७ जुलै २०२४ रोजी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रमोद पवार,प्रविन भाले, सचिन आठवले, धिरज कोल्हे, राकेश कोकांडे, धिरज कोल्हे, नरेश बिडकर, आकाश कोल्हारे, नरेश सोरटे, विनोद चोपकर, प्रकाश माथनकर, सुनील नगराळे, अतुल वासेकर, हेमंत कुमुजवार, विशाल जयस्वाल, शेख जमीर, अमोल चंदेल, प्रीतम लसंते, सचिन भेंडे, मुन्ना कोकण आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळेस सर्वाचे पक्षाचा दुप्पटा देऊन व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,गणेश वैरागडे, सुनील भुते, जगदीश वांदिले, राहुल जाधव, राजू मुडे, तुषार थुटे आदी उपस्थित होते…