फाॅरेस्ट डेपोत एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :विपणन वनविभाग चा परिसरात एका ५५ वर्षीय इसमाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या इसमचे नाव अशोक बापूराव वांढरे (५५) रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर येथील आहे.वाहतूक विपणन वनविभाग चा भामरागड आगारातील प्लॉट क्रमांक ४ येथे कर्मचारी गस्त करत असताना त्यांना झाडाला एका इसमाने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी लगेच वी. डी. पवार वनपाल यांना माहिती दिली. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन याची माहिती वरिष्ठांना दिली. तसेच पोलीस विभागाला तक्रार दिली.पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख‌ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुधाकर गुरुनुले करीत आहे.

CLICK TO SHARE