तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
दिवाळी पाडव्याला गाई गोवर्धन पुजन अल्लीपूर येथे साजरे करण्यात आले. ग्रामीण भागात कित्येक वर्षापासूनची परंपरा दिवाळीच्या पाडव्याला गाई गोवर्धन पुजन व मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गाईची पुजा शेतकरी करीत असतात. गाईला सजवून बँड बाजा सह गोवर्धन मिरवणूक मुख्य मार्गाने काढली जाते. यामध्ये गावातील युवा वर्ग मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात व या मिरवणुकीमध्ये लाटी काठी चे प्रात्यक्षिक सुद्धा सादर केले जाते. वर्षातून एकदा दिवाळीच्या पडव्याला निघालेले गोवर्धन मिरवणूक लोकांसाठी महत्वाचे मानले जाते.