राज्य परिवहन महामंडळ काटोल आगारा मार्फत विद्यार्थ्यांना मोफत पास वितरण

एज्युकेशन

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा:नरखेड तालुक्यातील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तसेच 66% रक्कम सवलत योजने अतंर्गत महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ काटोल प्रशासन तर्फे एस टी पास थेट तुमच्या शाळेत या मोहीमे अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनां दि ०८/०७/२०२४ ला पास वितरण करण्यात आले. या प्रसंगी एस टी महामंडळ काटोल आगार व्यवस्थापक श्री.अनंत ताटर, साहेब वाहतुक निरिक्षक विशाल हिवरकर यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना पास वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संदीप धोटे सर उपप्राचार्य भालचंद्र बेलसरे सर पर्यवेक्षक श्री गोस्वामी सर तसेच पवार मॅडम बडोदेकर मॅडम. वैष्णव मॅडम नवरंग सर माळोदे सर गडेकर सर. बनसोड सर मुंदाने सर हेटे सर मेनकुदळे सर उईके सर सातपुते सर कडु मॅडम अरसडे सर बुरांडे सर उपस्थित होते. नविन वर्षाच्या पहील्या सत्रातील शाळा सुरु झाल्या आहेत. ताल्युक्याच्या ठिकणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. विद्यालायात शिकविण्याचे कार्य सुरु झाले आहेत तेव्हा बाहेरगावारुन ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. आगारामधे कर्मचारी वर्ग तुटपुंजा असल्यामुळे बऱ्याच वेळा पास मिळत नाही त्यामुळे मनस्ताप होतो व शैक्षणिक नुकसान होते. यांचा एकदंरीत विचार करता शासनाने घरापासून शाळेपर्यतं जाण्यासाठी मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर फ्रि पास सवलत तर मुलांना केवळ ३३% रक्कम भरुन मासिक पास काढता येते.या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत मिळावा यासाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी शाळा महाविद्यालयात जावून पास वितरण करीत आहे. त्याच्या या स्तुत्य उपक्रमास शाळेतुन भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षक दोघांचाही वेळ वाचत आसल्यामूळे पालकां कडून आनंद व्यक्त करण्यात आला. सदर पास वितरणाचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी आनंद चौधरी बाबू शाळेतील शिक्षक सातपुते सर बनसोड सर. मुंदाने सर यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE