माझ्यावरील हल्ल्यामागे शेजारी गुप्ता परिवाराचा हात- अभिषेक मालु ह्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

क्राइम

अज्ञात हल्लेखोरांनी सकाळी केला होता गोळीबार व पेट्रोल बाॅम्ब ने हल्ला

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:शहरातिल वस्ती विभागात मालु वस्त्र भंडार चे मालक अभिषेक मालु यांच्यावर सकाळी गोळीबार करण्यात आला तसेच त्यांच्या दुकानात पेट्रोल बाॅम्ब फेकून दुकान जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचप्रमाणे हल्लेखोरानी केलेल्या चाकु हल्ल्यात एक कामगार जखमी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती.ह्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी संघटनांनी संतप्त बंद पाडून घटनेचा निषेध केला तसेच सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. वस्ती विभागातील मालु बंधुचे सर्वात जुने दुकान मोतीलाल प्रभुलाल मालु कपड्यांचे दुकान असून आज सकाळी १०.३० वाजताच्य सुमारास अभिषेक मालु यांनी दुकान उघडताच काही वेळाने अज्ञात तिन इसमांनी मोपेड गाडी वर येऊन दोन पेट्रोल बाॅम्ब (बियर चा बाॅटल मध्ये पेट्रोल) फेकून दुकान जाळण्याचा प्रयत्न केले.आणी दुकानात घुसुन चाकु ने एका कामगारांवर हल्ला केला या हल्ल्यात दुकानातील नोकर कार्तिक साखरकर वय (२५ ) वर्ष यांचा पायाला चाकु लागला असुन त्याला उपचार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले सायंकाळी पत्रकार परिषदेत व्यापारी संघटनेचे सदस्य मालु बंधुसह उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की मागील महिन्यात सुद्धा तिन इसमांनी अभिषेक मालु यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दीड दोन वर्षांत यांच्यावंर झालेला हा तिसरा हल्ला दीड वर्षापूर्वी शाॅट सर्किट मुळे दुकानाला आग लागली होती त्यात करोडो रुपयांचा कापड तसेच फर्निचर जळुन खाक झाले होते.सुरवातीलाहीआग शाॅट सर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र सखोल तपासाअंती सदर आग पेट्रोल टाकून लावण्यात आल्याने निष्पन्न झाले होते.सदर घटनेमध्ये सुरज गुप्ता ह्यंचेवर संशय व्यक्त करण्यात आला होता.मात्र घटनेपासून सुरज गुप्ता फरार आहे हे विशेष.मालु परिवारात आगामी काही दिवसांत मंगल कार्य आयोजित करण्यात आले आहे ह्या प्रसंगी कुठल्याही अनुसूचित प्रसंग घडु नये यासाठी मालु परिवाराने मागील काही काळापासून त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र रविवार दिनांक ७ रोजी जुलै रोजी झालेल्या हल्ल्यापर्यंत पोलिसांनी कुठलीही सुरक्षा मालु परिवारला परिवाराला पुरवलीु नाही आठवड्यापूर्वी अभिषेक मालु ह्याचेवर लुटण्याचा उद्देशाने हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोर त्यावेळी हातात चाकु घेऊन त्यांच्या मागे लागले होते मात्र त्यातील आरोपींना जेरबंद करण्यात बल्लारपूर पोलिसांना अजुनही यश आले नाही.दीड वर्षापूर्वी झालेली दुकानाच्या जाडपोळीची घटना व मागील आठवड्यातील हल्ल्याचा प्रयत्न हा दोन्ही घटनातील गुन्हेगार अद्यापही मोकाट फिरत असल्याने गुप्ता ह्यंचे मनोबल वाढले असून त्यामुळेच त्यांनी गोळीबार व पेट्रोल बाॅम्ब फेकण्याची हिम्मत केल्याचे अभिषेक मालु यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असुन हा सर्व घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे घडत असल्याचा केला आहे.आजच्या हल्यावेळी प्रसंगावधान राखून अभिषेक मालु ह्यांनी पळ काढला नसता तर त्यांच्या जीवावर बेतले असते हे निश्चित. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले व्यापारी मंडळाचे राजु मुंदडा, इब्राहिम झव्हेरी, रामधन सोमाणी, गोपाल खंडेलवाल ह्यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असुन २४ तासांच्या आत हल्लेखोरांना जेरबंद न केल्यास शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.पोलीसांनी गुप्ता परिवारातील दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख‌ ह्यांच्या नेतृत्वात सुरू आहे.

CLICK TO SHARE