नहर रोडवर कबाळीवाल्याचे अतिक्रमण ला महिलांचे विरोध

सोशल

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगाव मो 9545710663

आमगाव : नगर परिषद अंतर्गत नहर रोड माल्ली येथे कबाळी मालकाने अतिक्रमण केल्याने महिलांनी आक्रोश आंदोलन छेडले.आमगाव नगर परिषद च्या हदीतील बाग इरिकेसन आमगाव शाखेतील माल्ली कॅनल हनुमान मंदिर समोर एका इसमाने कबाळीचीं दुकान थाटतो म्हणून चक्क नहरत लोखंडी कॉलम गाळले.सदर कॅनल शेतकऱ्यांना शेतात पाणी पुरवन्याचे कार्य करते,त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचणार नाही आणि कबाळी दुकानामुळे रहदारीला अळथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे शासकीय मालमत्तेवर अधिकार गाजवून राजरोषपणा करू नये या करिता महिला, पुरुषांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.सदर कॅनल वर अतिक्रमण झाल्याची माहिती बाग सिंचाई विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीषा कठाणे, शाखा अभियंता स्वाती बहेकार, यांना देण्यात आली त्यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट दिली व त्यांनी तात्काळ अतिक्रमण काढून घ्यावे अशी सूचना दिली.आंदोलनात सहभागी अरुणा गोंडाणे.अनिता कटरे.रेखा दमाहे.हेमलता बिसेन.रजनी शेंडे.प्रभा उपराडे.किशोरी दोनोडे.सरीता नवगोडे.रेखा कटरे.माया सोनवाने. कमल हरिणखेडे.मिनाक्षी बघेले.कविता हत्तीमारे.उषा टेंभरे..निता पटले,पदमा कुराहे,अंकीता मोहनकर सीमा बागडे, गायत्री गराडे, लक्ष्मी व-हाडे मोटघरे मेडम, चंद्र कांता टेंभरे,शारदा सोनवाने,रेखा भांडारकर,सुशीला कुंभारे, सुनंदा निखारे यांचा सहभाग होता.

CLICK TO SHARE