वसमतचे अब्दुल हफिज तेलंगानाच्या दोन विधानसभेचे प्रभारी

चुनाव

हिंगोली(प्रतिनिधी) अशोक इंगोले

वसमत: तेलंगाना येथें विधानसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू असून जुबली हिल्स, निजामाबाद अर्बन विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहेमान यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहेतेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणातील निजामाबाद अर्बन ( उमेदवार शब्बीर अली) आणि जुबली हिल्स (उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन) या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अब्दुल हफिज यांची नियुक्ती केली आहेतेलंगणा विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुमचा अनुभव लक्षात घेऊन ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघात त्वरित पोहोचा आणि तुमच्या अनुभवानुसार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने प्रचार करून विजयश्री मिळवण्यात हातभार लावण्याचे नियक्ती पत्रात सुचित करण्यात आले आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असलेले अब्दुल हफिज यांनी या पूर्वीही अनेक राज्यात विधानसभा प्रभारी म्हणून काम पाहिले असून दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडल्याने पक्षश्रेष्ठीने त्यांना या वेळी दोन विधानसभेचा प्रभारी करत मोठी जबाबदारी सोपवली आहे

CLICK TO SHARE