प्रतिनिधी:- शारुखखान पठाण वरोरा
चंद्रपूर वरोरा :- वरोरा शहरातील रहिवाशी सुरेंद्र सुभाषचंद सोनटक्के ( 45 ) वर्षे यांची मुलगी अक्षता पंधरा वर्षे हीची सायकल चोरणाऱ्या चोरट्याला पकडून दिले मात्र चोराला पकडून देणाऱ्याला सात तास ताटकळत बसवून ठेवले. सुरेंद्र सोनटक्के याची लहान मुलगी अक्षता सुरेंद्र सोनटक्के वय 15 वर्ष ही शहरातील मिश्रा यांच्या देशी भट्टी जवळ असणाऱ्या विजन अँड मॅट्रिकल अकॅडमी यांच्या कोचिंग क्लासेस मध्ये शिकण्यासाठी जात असते. अक्षता दहावी या इयत्तेत शिकत आहे. ही नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता कोचिंगला गेली. सकाळी आठ वाजता शिकवणी वर्ग संपल्यावर सायकल स्टॅन्ड जवळ गेली असता तिला सायकल दिसली नाही. हा प्रकार तिने शिकवणी शिक्षकांना सांगीतला. तेव्हा सरांनी अक्षता च्या घरी फोन करून याची माहिती दिली. अक्षताच्या वडिलांना याची माहिती होताच ते सायकलच्या शोधात गावात अनेक ठिकाणी फिरले त्यात भंगार, भट्टी अशा अनेक ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली असता आरोपी सुधाकर केशव आत्राम वय 50 वर्ष राहणार शेंबळ हा देशी भट्टी जवळ बसला असून हा कोंबडे, सायकली चोरतो अशी माहिती मिळाली. गाठून सायकली बाबत विचारणा केली. शेवटी धाक देतास त्याने प्रिया झेरॉक्स जवळ सायकल ठेवल्याचे सांगितले. सायकल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविण्यासाठी गेले मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी सुरेंद्र यांना सात तास बसवून ठेवले, कंटाळून त्यांनी “चोर सोडून संन्यासाला सजा” असा प्रकार सुरेंद्र सोनटक्के यांनी अनुभवल्याने सामान्य माणसाने पोलिसांना सहकार्य करावे की नाही अशी भावना प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. पोलिसांनी हा गुन्हा अदाखलपात्र असल्याचे सांगितले आरोपीला भारतीय न्याय संहिता 303( 2 ) नुसार गुन्हा नोंदवीला.