भूमी अभिलेख कार्यालय हिंगणघाट मौका चौकशी मोजणीत पाप उघड

क्राइम

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :- विक्की कोटेवार याने तेलंग पेट्रोल पंप समोरील संत साईकृपा सोसायटी हिंगणघाट येथील सर्व्ह नंबर 90/1 प्लॉट नंबर 2 ची क प्रत,प्लॉट ची मोजणी चुकीची आहे संबंधित प्रकरणाची चौकशीची मागणी जिल्हा भूमी अधीक्षक वर्धा, उप संचालक भूमी अभिलेख नागपूर यांना केली होती.त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालय हिंगणघाट कडुन मौका चौकशी 6 नोव्हेंबर ला होती ती रद्द केली. त्या ऐवजी 16 नोव्हेंबर ला ठेवली. (रद्द का झाली हा संशोधनाचा विषय आहे ) मौका चौकशी मध्ये हिंगणघाट नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्लॉट धारक विजय गुणवंत वंजारे, तक्रारदार विक्की कोटेवार यांना पत्र पाठविले परंतु राष्ट्रीय राजमार्ग विभाग यांना पत्र का पाठविले नाही ? मौका चौकशी करतांना या सर्वासमोर भूमी अभिलेख कार्यालय हिंगणघाट यांचे पाप उघड झाले असते दी.16 नोव्हेंबर ला मौका चौकशी करतांना जागेवर प्रदीप आर्य,विलास प्रभाकर वैद्य उपस्थित होते. यांच्यासमोर मौका चौकशी पंचनामा केला. तक्रारदार विक्की कोटेवार याला कोणतीही माहिती दिली नाही. विक्की कोटेवार याने या जागेवर आज मोजणी असल्यामुळे प्रतिनिधी ठेवला होता त्याने फोनवरून विक्की कोटेवार याला माहिती दिली विक्की कोटेवार आला असता मौका चौकशी पंचनामा झाला सांगितले.भू मापक यांना प्लॉट बद्दल विचारले प्लॉट ची आराजी व प्लॉट एकूण किती फुट आहे ? भू मापक यांनी प्लॉट हा 30/15 मीटर एकूण 4500 फुट प्लॉट आहे.याची मोजनी आमच्या समोर करा तेव्हा 30 मीटर लांब प्लॉट ची मोजणी केली तर राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत प्लॉट 15 मीटर जागा येते. संत साईकृपा सोसायटी यांचा सर्विस रस्ता 3.5 ते 4.5 मीटर रोड हा जोडला तर राष्ट्रीय राजमार्ग ची जागा जागेवर नाही ? भूमी अभिलेख यांनी अश्या अनेक प्रकरणात या रोडवर अनेक मोठे पाप केले आहे यावरून भूमी अभिलेख यांनी केलेली मौका चौकशी पंचनामा हा 100 % बोगस आहे.या प्रकरणात संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्रतिनिधी, हिंगणघाट नगर पालिका प्रतिनिधी यांची उपस्थिती आवश्यक होती ? मौका चौकशी पंचनामा हा निमानुसार नाही. बोगस पंचनामा बोगस अहवाल सुद्धा राहील तो वरिष्ठठाणा सादर केल्या जाईल त्या अगोदर जिल्हाधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणात आपल्या विभागाकडून लक्ष देऊन दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी संबंधित पुराव्या सहित लवकरच भेट घेणार असल्याचे विक्की कोटेवार याने प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले .

CLICK TO SHARE