पहिला विदर्भस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा काटोल
प्रतिनिधी:साजिद खान नागपुर
काटोल:दिनांक -16/11/2023 आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व सांभाळून मुलींनी खेळ करावा ही जिगरीची बाब आहे . एखाद्या वेळी मुलगा थकून भागुन आला की त्याला घरी प्रेमाची थाप मिळते. तर मुली बाहेरून आल्या की त्यांना प्रेमाची छाप येत नाही. अशाही परिस्थितीत मुली विविध क्षेत्राबरोबर खेळातही नैपुण्य दाखविण्यात अग्रेसर आहेत. खेळामध्ये एक संघ जिंकणार आहे तर एक संघ हारणार आहे अशा परिस्थितीत खेळाडू मध्ये खिलाडूवृत्ती असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सौ.वैशालीताई ठाकूर यांनी केले त्या काटोल येथे नगरपरिषद शाळा क्रमांक 2 च्या क्रीडांगणावर आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनिय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेटरी- जुनेवाणी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.सविता बागडे तर प्रमुख अतिथी म्हणून अम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भाचे सहसचिव सतीश डफरे, तसेच मुख्याध्यापक प्रभाकर भस्मे,माजी नगरसेविका सौ. शालिनीताई बनसोड, सौ. जयश्रीताई बुरसे,प्रदीप शेटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन,ध्वजारोहन तसेच क्रीडांगणाची पूजन करण्यात आले.कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतीकरता शत्रुघन राऊत गजू गावंडे, विलास धवड,दिलीप जिचकार,किशोर सावरकर, तुषार राऊत,वसीम पठाण,सुनील थापे, दीपक बगडे प्रयत्न करीत आहे.