बल्लारपूर येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले (४०) असे पोलीस शिपाई चे नाव आहे. अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. मागील पाच सहा दिवसांपासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज त्याचे मामा हरीचंद्र बालाजी निकुरे रा. चंद्रपूर हे अजय ला भेटण्याकरिता आले असता त्यांना दरवाजा आतून बंद दिसला. तसेच आतून दुर्गंध येत होती. त्यांनी लगेच आजूबाजूच्या क्वार्टर चा लोकांना सांगितले. तसेच पोलीस स्टेशन येथे माहिती दिली अजय यांनी दोन दिवसापूर्वी केली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केले. या घटनेचा पोलीसांनी पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, पोशी खंडेराव माने करत आहे. मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे. पोलीस शिपाही अजय यांनी अगोदर सुद्धा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा आहे

CLICK TO SHARE