तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (वर्ष अकरावे) अल्लीपूर, तालुका – हिंगणघाट, जिल्हा – वर्धा. येथे राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन श्री संत सद्गुरु आबाजी महाराज दहीहंडी व कार्तिक उत्सवाच्या शुभमुहूर्तावर दिनांक ८ डिसेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान प्रार्थना मंदिर, भवानी वॉर्ड, पोलीस स्टेशन रोड, अल्लीपूर. येथे ग्रामीण गट, शहरी गट, बालगट व महिला गटामध्ये भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे करण्यात आलेले आहे.
त्याच बरोबर शुक्रवार दिनांक ०८ डिसेंबर २०२४ ला सायंकाळी ७.०० सप्त खंजिरी वादक श्री दिपक भांडेकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे.
शनिवार दिनांक शनिवार ०९ डिसेंबर 2023 ला सकाळी ७.३० वाजता चित्रकला स्पर्धेचे (शालेय गट व खुला गटामध्ये) आयोजन करण्यात आले. तर रविवार दिनांक १० डिसेंबर
2023 ला सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर (रक्तदात्याला टिफिन बॉक्स भेट देण्यात येईल) आयोजित केले आहे.
तरी आपण सर्व गुरुदेव प्रेमींनी तसेच भाविक भक्तांनी या खंजेरि
स्पर्धेचा , चित्रकला स्पर्धेचा तसेच रक्तदान शिबीर अशा भरगच्च नैतिक गुणांच्या विकासात्मक कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्व स्पर्धमध्ये स्पर्धकांनी अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
₹