अल्लिपुर मध्ये भरपूर प्लॉट पडून राहिले आहे

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर गाव सर्वात मोठे गाव म्हणून ओळख आहे. आता थेट भूमाफियांनी अल्लीपूर गावात शेती खरेदी करून प्लॉट पाडणे सुरु केले आहे. भूमाफियांमार्फत अव्वाच्या सव्वा किमतीने शेती खरेदी केली आहे. जास्त दराने प्लॉट विक्री सुरु केली असून काही ठिकाणी तर ना पाण्याची व्यवस्था, वीज खांब देखील उभे न करता चढ्या दराने विक्रीला सुरुवात केली आहे. अनेक भूमाफियांकडे ग्रा.पं. कर थकीत आहे. त्यांनी तो अद्यापही भरलेला नाही. याला सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत. पूर्ण सुविधा झाल्याशिवाय प्लॉट खरेदी करू नये, अशी चर्चा जनमानसात सुरु आहे.

CLICK TO SHARE