बोडखा कोसरसार मार्ग पावसामुळे बंद,पुलाचे बांधकाम व खोलीकरणाची ग्रामस्थांची मागणी

अन्य

प्रतिनिधी = पवन ढोके वरोरा

वरोरा/ चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यातील बोडखा ते कोसरसार रोड लगत मोठा नाला असल्याने वरच्या पावसाने व लबान सराट धरणाच्या पाण्यामुळे नाला पूर्ण पाण्याने तुंबलेला असुन शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती, शेतकरी, कामगार यांचा जाण्या येणाचा मार्ग पूर्ण बंद झाला आहे.यामुळे बोडखा ग्रामवासियांची ही मोठी अडचण खुप वर्षापासूनची आहे.बोडखा हा गांव चंद्रपूर जिल्हाचा सीमेवरचा शेवटचा गांव असल्याने या गावच्या विकासावर पालकमंत्री,स्थानिक लोक प्रतिनिधी यांच लक्ष केंद्रीत झालं नाही. बोडखा ग्रामवासियांना पावसाळ्यात तालुक्याला जाण्या येण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. प्रशासनाने लक्ष घालुन कोसरसार नाल्यावरचे पुलांचे बांधकाम, नाल्याचे खोलीकरणं व रोडचे बांधकाम करावे अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोडखा मोकाशी येथील शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे,सरपंच नामदेव थाटे, सोसायटी सदस्य रवी तुराळे,राजू तडस, समीर तुराळे, संकेत तडस, रामभाऊ भरडे,मयूर तडस,अमित कामडी, शुभम तुराळे, चेतन तुराळे, वैभव तुराळे,अंकित घेणगारे, सुरज थाटे या समस्त ग्रामवासियांची आहे.

CLICK TO SHARE