बोपापुर ते खांबाडा रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करु – युवासेनेचे तुषार बोरेकरांचा इशारा

अन्य

प्रतिनिधी = पवन ढोके ( वरोरा )

वरोरा – तालुक्यातील बोपापूर ते खांबाडा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात तलाव की तलावात रस्ता हेच समजत नाही. पावसाळा सुरू झाला आहे रस्त्यातील खड्यांत पाणी साचल्याने अनेक अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करा अन्यथा शिवसेना पद्धतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा युवासेनेचे तुषार बोरकर यांनी दिला आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे अनेक निवेदन देऊन देखील बांधकाम विभाग झोपेत आहे. आता यापुढे हे खपवून घेणार नाही. रस्त्यात 2 ते 3 फुटाचे खोल खड्डे पडले आहेत. तरी तात्काळ रस्त्याची कामे करावी अन्यथा शिवसेना (उबाठा) आक्रमक भूमिका घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा युवासेनेचे तुषार बोरकर यांनी दिला आहे.

CLICK TO SHARE