दारू तस्करासहित जुगार प्रेमिंच्या आवरल्या मुसक्या
दारुविक्रेत्यांचा काही “तळीरामाना” पकडुन ठाणेदार यांचेवर उलट-सुलट आरोप- प्रत्यारोप स्थानिक
अल्लीपूर हे गाव लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे गाव असून त्या गावात मोठ्या प्रमाणामध्ये दारू तस्करी व जुगार अड्डे निर्माण झाले होते, काही दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक नुरूल हसन वर्धा यांनी या गावातील दारू तस्करांच्या व जुगार भरवणाऱ्यांच्या मुस्क्या आवरण्याकरिता ठाणेदार म्हणून श्री. डाहुले यांना चार्ज दिला होता, ठाणेदार डाहुले यांनी अल्लीपूर पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज स्वीकारताच अल्लीपूर भागातील काही मोठ्या माशांवर लक्ष ठेवत कडक दारूबंदीवर चांगलीच वचक मिळवली असून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगारावर सुद्धा त्यांनी बंदी आणली आहे,मात्र मोठ्या काही दारू विक्रेत्याकडून व जुगार्यांकडून काही तळीरामांना भडकवून अल्लीपुर येथे मोठ्या प्रमाणात दारू सुरू असल्याचे बदनामीकारक आरोप सातत्याने सुरू आहे,मात्र अल्लीपूर गावातील सुज्ञ नागरिक गाव अतिशय शांत असल्याने ठाणेदार डाहुले यांच्या कार्यावर प्रभावित झाले असून,वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांचा दारूबंदी पॅटर्न अल्लीपुर गावात ठाणेदार श्री.डाहुले यांनी यशस्वी केल्याचं चित्र दिसून येते आहे…