साई स्पोर्टीग क्लब काटोलच्या महिला खेळाडूंनी आणि संयोजकांनी खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्ती दाखविली-चरण सिंग ठाकूर

खेल

विजेता मराठा लांसर्स नागपूर,उपविजेता साई स्पोर्टीग काटोल

प्रतिनीधी:साजिद खान नागपुर

काटोल:दिनांक 19.11.2023काटोल शहराला साहित्य,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्राचा वारसा लाभलेला असून काटोल- नरखेड तालुक्यातून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात स्वतः बरोबरच गावाचा राज्य ,राष्ट्रीय पातळीवर नावलोकिक केलेला आहे.पहिल्या विदर्भस्तरिय महिला कबड्डी स्पर्धेच्या आधुनिक पद्धतीने म्याट्वर केलेल्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना अधिक नावलोकिक प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. अंतिम सामन्यादरम्यान क्रीडांगणावर पडलेल्या आद्रतेचा विचार करून कोणत्याही खेळाडूंना गंभीर दुखापत होऊ नये याचा विचार करून साई स्पोर्टीग काटोलच्या खेळाडू आणि संयोजकांनी अतिशय कमी 5 गुणाचा फरक असताना मोठ्या मनाने निर्णय घेत मराठा लॉनसर्स नागपूरला विजेतेपद देऊन खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्ती दाखविली ही खरी काटोलच्या मातीची ओळख आहे.असे प्रतिपादन काटोल कृ. ऊ.बा.समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी केले.ते नगर परिषद शाळा क्र.2 च्यां क्रीडांगणावर साई क्रीडा मंडळाचे वतीने आयोजीत पहिल्या महिला कबड्डी स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे, न.प.काटोलचे अभियंता नितीन गौरखेडे,जेष्ठ नागरिक अशोक काळे,हेमंत कावडकर, गोपालजी चांडक,अंशू ठाकूर,अमोल सरोदे,नमजी अली उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजेत्या मराठा लोंसर्स नागपूर ला 31 हजार रोख,ट्रॉफी, उपविजेता साई स्पोर्टीग काटोल ला 21हजार रोख ,ट्रॉफी तर तिसरे बक्षीस रवींद्र क्रीडा मंडळ आणि साई विदर्भ,मोर्शी या संघाना प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये बेस्ट रेडर म्हणून तनु ठाकरे,बेस्ट कॅचर म्हणून मुस्कान लोखंडे काटोल, बेस्ट प्लेयर म्हणून नम्रता गाढवे तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून सोनल राठोड हे खेळाडू आकर्षित बक्षिसाचे मानकरी ठरले. आयोजित महिला कबड्डी स्पर्धेत विदर्भातील वाशिम,अकोला,अचलपूर,उमरेड,अजणी,कामठी, मोर्शी,19नामवंत संघ सहभागी झाले होते.स्पर्धा नियंत्रक म्हणून पद्माकर देशमुख, देवाभाऊ कामडी, यांनी भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन भूषण भोयर यांनी केले.तर आभार प्रदर्शन शत्रुघ्न राऊत यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी शत्रुघ्न राऊत,विलास धवड,गजू गावंडे,भूषण भोयर,किशोर रेवतकर,दिलीप जिचकार,तुषार राऊत,वसीम पठाण,दीपक बगडे,चंद्रकांत चौधरी,मंडळाचे खेळाडू.यांनी अथक परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE