तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर :
सेवाग्राम रुग्णालयातदाखल असलेल्या नातेवाइकांची भेट घेऊन दुचाकीने जात असलेल्या दुचाकीचालकाने समोरून येणाऱ्या बसला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान तळेगाव ते आष्टा मार्गावर झाला.अनिल तलमले, रा. वायगाव व त्याची आत्या प्रेमिला चांभारे हे दोघेही एम.एच.३ यू६४४२ क्रमांकाच्या दुचाकीने सेवाग्राम रुग्णालयातील नातेवाइकाला भेटून आष्टा मार्गे वायगावकडे येत होते. यादरम्यान आष्ट्याकडून हिंगणघाट ते वायगाव महामार्गावर येताना एम.एच.१३ सी.यू. ८३४ क्रमाकाची बस वायगावकडूनहिंगणघाटकडे जात होती. यादरम्यान दुचाकीचालक अनिल यांनी बसला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार प्रेमिला चांभारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच अल्लीपूरचे ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पंचनामा करुन जखमी अनिलला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले तर प्रेमिला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार डाहले करीत आहे.