तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
स्थानीक यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर येथे यशवंत ग्रामीण शिक्षक संस्था वर्धा संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. बापुरावजी उर्फ दाआजी देशमुख यांची 34 वी पुण्यतिथी शाळेमध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मला नंदूरकर मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून कु. वनिता कोपरकर मॅडम उपस्थित होते.पुण्यतिथी निमित्त शाळेतील विद्यार्थी यांनी स्व. बापुरावजी देशमुख यांच्या जीवन कार्याबदल भाषण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कैलास नागरे सर यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. दिनेशकुमार काळे सर यांनी केले. शबाळासाहेब पाटील सर, योगिता साळवे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. अश्या प्रकारे यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर येथे स्व. बापुरावजी देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक , शिक्षिका , विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थीत होते