गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी – चारचाकी वाहनाचे बॅट-या चोरी करणा-या दोन चोरट्यांना अटक मुद्देमाल हस्तगत.

क्राइम

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव( गोदिया)

याबाबत थोडक्यात माहिती की, घटना दिनांक १७/११ /२०२३ रोजी रात्र दरम्यान फिर्यादी- रंजीत शामराव पुराम रा. पोष्टमन चौक, वाजपेयी वार्ड, गोंदिया यांनी त्यांचे मालकीचे ट्रक उभे करुन ठेवले होते. त्या ट्रक मध्ये बसवलेली एक्साईड कंम्पनीची बँटरी तसेच गणेश मयाराम मोहबे यांचे अँटो मध्ये बसवलेली एक्साईड कंम्पनीची बॅटरी एकुण किंमती १३,०००/- रू. अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तक्रार वरुन पो.स्टे. गोंदिया शहर अप.क्रं. ७४१/२०२३, कलम ३७९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते…

       पोलीस अधिक्षक,  श्री.निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी दिलेल्या निर्देश सूचना प्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पो.नि.श्री चंद्रकांत सुर्यवंशी तसेच पो.नि.श्री सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटी करण पथकातील पोलीस अंमलदारानी गोपनिय  माहितीच्या आधारे *संशयित इसम नामे-* 

१) राज उर्फ मारी शुशिल जोसफ वय-२० वर्षे

२) फरहान ईशाक कुरैशी वय- १९ वर्षे दोन्ही रा. गौतमनगर, गोंदिया जिल्हा गोंदिया

      यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. त्यांचेकडे बॅटऱ्या चोरीच्या गुन्हासंबंधाने विचारपूस, तपास केला असता त्यांनी त्यांचा एक अल्पवयीन मित्र याचेसोबत ट्रक, ऑटो मधील २ बॅट-या चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यांचे जवळुन एक्साईड कंम्पनीच्या २ बॅटरी अ. *किंमत १३,०००/- रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे* .सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. कवलपाल सिंग भाटीया, करीत आहेत.

   सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना व मार्गदर्शनाखाली,उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. सुनिल ताजणे, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री चंद्रकांत सुर्यवंशी, पो.नि. सचिन म्हेत्रे, स.पो.नि. रामभाऊ व्होंडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, दिपक रहांगडाले,मपोहवा. रिना चौव्हाण, पो.शि. अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली.
CLICK TO SHARE