तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
हिंगणघाट तालुक्यातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार असून सदर वाघ हा समुद्रपुर खापरी कोरा शिवारात काही शेतमजूरांना दिसला त्यांनंतर हा वाघ पारडी शिवार मार्गे जाम व हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट परिसरात दिसला या वाघाच्या मुक्त संचारामुळे शेतकरी चिंतेत असून ऐन हंगामात वाघाच्या दहशतीमुळे शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत या वाघाला जेरबंद करण्यासाठी नागरिकांची मागणी असून आमदार कुणावार यांनी तातडीने वनमंत्री तथा पालकमंत्री वर्धा सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली.