हिंगणघाट भूमी अभिलेख कार्यालयात प्रशांत येते पुन्हा कामावर

सोशल

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यलय येथे तालुक्यातिल जनतेची, शेतकऱ्यांची मोजणी, फेरफार, दुरुस्ती कामे वेळेच्या आत होत नाही, तेच कामे दलालाच्या माध्यमातुन केले तर ताबडतोब होतात अशा अनेक तक्रारी आमदार समीर कुणावर याच्या कडे करण्यात आल्या या वरुण दी. 30 ऑटोबरला आमदार समीर कुणावार यांनी, हिंगणघाट भूमी अभिलेख कार्यालयात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तहसिलदार सतिश मासाळ यांच्या उपस्थित प्रभारी उपअधिक्षक भूमी अभिलेख अधिकारी सुनिल बन व परिनिरीक्षक भूमापक अधिकारी प्रशांत येते व इतर कर्मचारी तक्रार करते, पत्रकार यांच्या उपस्थिती मध्ये जनतेची कामे वेळेच्या आत होत नाही या कारणावरून येथिल अधिकारी व कर्मचारी यांची कानउघडनी आमदार समीर कुणावार यांनी केली तसेच येथिल कर्मचारी दलाला मार्फत ताबडतोब कामे करतात येथिल कर्मचारी व दलाल यांचा शोध घेऊन कार्यवाही करावी या साठी उपसंचालक भूमी अभिलेख अधिकारी नागपुर यांना दि 31 ऑक्टोबरला बोलावले याच दिवशी प्रशांत येते कामावर असताना आमदार समीर कुणावार कार्यालयात आले व ऑफीस मध्ये काम बरोबर केले नाही त्यामुळे शेतकर्याना त्रास होतो या कारणावरून शिवीगाळ केली, अशील भाषेत शिवीगाळ केली, चपलीनी मारनेची धमकी दीली या कारणामुळे माझ्या पतीने विषारी औषध घेतले असा आरोप केला असे सौ.राजश्री प्रशांत येते यांनी सेवाग्राम पोलिस स्टेशनला सांगितले . या प्रकरणात पुढे काय समोर आले हिंगणघाट भूमी अभिलेख इथे कामे होत नाही. लेखी तक्रार कर्मचारी विरोधात नाही, उप अधिक्षक अधिकारी प्रभारी असल्यामुळे कामे वेळेच्या आत निकाली निघत नाही.कर्मचारी, अधिकारी दोषी आढळले नाही,या ठिकाणी पुर्णवेळ भूमी अभिलेख उपअधीक्षक अधिकारी लवकरच येणार आहे अशी माहिती प्रशांत येते यांनी दिली.

CLICK TO SHARE