जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:पोलीस ठाणे आरमोरी हद्दीतील मौजा ठाणेगाव (नवीन) येथे श्रीमती संपदा नानाजी काळबांधे, वय 59 वर्ष, राहणार ठाणेगाव यांच्या घरामध्ये सकाळी 11:00 वाजता दरम्यान 03 अज्ञात इस्मानी घरात प्रवेश करून फिर्यादीस खुर्चीला बांधून तिच्या घरातून सोन्याचे दागिने, पैसे व मोबाईल असा एकूण अंदाजे 4 लक्ष रुपयाचा माल लुटून (जबरी चोरी करून) नेला.सदर आरोपीतांचे वर्णन तिन्ही चोरट्याने मंकी कॅप घातल्या होत्या व तिघांनी फुलबायाची टी-शर्ट घातलेली होती त्यापैकी एकाने पोपटी रंगाची टी-शर्ट घातलेली होती तसेच एका चोरट्याचे उजव्या हाताच्या मधल्या बोटात चावा घेतल्याने दुखापत झालेली आहे वरील तीनही चोरटे हे 25 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत