सालेकसा तालुक्यातील सामाजिक व राजनैतिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सोशल

प्रतिनिधि:माइकल मेश्राम सालेकसा

सालेकसा:आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक कार्यावर विश्वास ठेवून सालेकसा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नरेश महेश्वरी, श्री सुरेश हर्षे, डॉ अजय उमाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सालेकसा तालुक्यातील श्री माईकल मेश्राम, श्री बाजीराव तरोने यांची घरवापसी व सामाजिक व राजनैतिक कार्यात ख्याति प्राप्त व स्वताचा अस्तित्व तालुकयात निर्माण केले असे श्री ब्रजभुषण बैस, त्याच प्रकारे आम आदमी पार्टी चे सालेकसा तालुकयात पक्ष उभारनिचे कार्य केले असे आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष श्री महेंद्र सिंग बैस, संघर्ष वाहन चालक मालक संगठन चे तालुका अध्यक्ष श्री सुरेश कुंभरे, श्री झनक नागपुरे, श्री मुकेश मेहरे, तालुका पत्रकार संगठन चे सदस्य पत्रकार श्री यशवंत शेंडे (दैनिक सकाड़) यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचा माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी दुपट्टा वापरून पक्षात प्रवेश केला. दरम्यान खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशानुसार तालुक्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी मायकल मेश्राम यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पदी तर बाजीराव तरोने यांची सालेकसा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, डॉ अजय उमाटे, केतन तुरकर, अखिलेश सेठ, निकेश गावड, रघुजी नागपुरे, संतोष नागपुरे, चंद्रपाल पटले, किरण पारधी, रवी पटले, लव माटे, आरजू मेश्राम, सुरेश चुटे, शैलेश वासनिक, कपिल बावनथडे, प्रमोद कोसरकर, रौनक ठाकूर, दर्पण वानखेडे, कुणाल बावनथडे, नरेंद्र बेळगे, वामन गेडाम सहीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE