गावातील नागरिकांन अभावी अल्लीपूरची प्रत्येक ग्रामसभा होते तहकूब

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर

हिंगणघाट:तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून अल्लीपूर गावाची ओळख आहे. अल्लीपूर ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांचे पॅनल व एक सरपंच असे एकूण १८ जणांचे पॅनल आहे. राजकीयदृष्ट्या सुद्धा गावाला खासदार व जिल्हाध्यक्ष ही पदे भूषवली आहे. मात्र, मागील चार वर्षांपासून ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामसभा पूर्ण झाली नसून प्रत्येक ग्रामसभा तहकूब होत आहे. नागरिकांची उदासीनता याला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. ग्रामसभा घेण्यासाठी रितसर गावामध्ये दवंडीसुद्धा ग्रामपंचायतीमार्फत दिली जाते. नोटीस बोर्डवर ज्या तारखेला ग्रामसभा आयोजित केली असेल त्या तारखेच्या माहितीसह नोटीस देखील लावण्यात येते. ग्रामसभेला नागरिकांनी उपस्थित राहण्याची गरज असतानाही प्रत्येक ग्रामसभा ही गावातील १०० वरनागरिकही उपस्थित राहत नसल्याने सभा तहकूब करावी लागते. यावरून गावातील नागरिकांची ग्रामसभेला अनुपस्थिती का, नागरिक कितीउदासीन आहे, याचा प्रत्यय येतो.ग्रामसभेचे महत्त्व नागरिकांना अजूनही समजले की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

CLICK TO SHARE