सामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र अभिजित कुडे यांची शिवसेना(ऊ बा ठा)विधानसभा युवा अधिकारी पदी निवड

सोशल

वरोरा/ब्यूरो

वरोरा:- तालुक्यातील उखर्डा या छोट्याश्या गावातून राजकारणाची सुरुवात करणारा एक सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील 23 वर्षीय अभिजित ची विधानसभा युवा अधिकारी पदावर मजल. राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात रस असणार्‍या अभिजित चे काम एकाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असे आहे या आधी सुद्धा अभिजित विधानसभा अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, विविध सामाजिक संघटना चे जिल्हा अध्यक्ष पद भूषविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधानसभा युवा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब, सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार अभिजित कुडे यांना विधानसभा युवा अधिकारी पदी निवड करण्यात आली. विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चे काम करत होता त्याच्या कार्याचा व्याप, जनसंपर्क बघून त्याला पद देण्यात आले. या साठी अभिजित ने विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर महिला जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर यांचे आभार मानले. शेतकरी असो, विद्यार्थी, अपंग,निराधार सर्व घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेवून त्यांनी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. रस्त्यासाठी गेल्या 2 वर्षात त्यांनी संपूर्ण तालुक्यात आवाज उठवला आहे. 43 आंदोलन सतत पाठपुरावा अभिनव आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरत अनेक रस्ते मंजूर करण्यात आले त्या नंतर कामाची गुणवत्ता असो निडर पणे अभिजित लोकांसाठी कुणाशीही भिडतात. शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. नागरी माढेळी भागातील लोकांना त्यांच्या मध्ये एक उच्च शिक्षित राजकारणी म्हणून बघत आहे. गरीब कुटुंबातील मुलगा राजकारणात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करत आहे. नागरी माढेळी जिल्हा परिषद त्यांनी लढावी अशी लोकांची इच्छा आहे. दिवसरात्र लोकांच्या साठी झटणारे नेतृत्व म्हणजे अभिनित कुडे . दिलेल्या पदाला न्याय देणार, वरीष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करणार असे अभिजीत कुडे यांनी सांगितले

CLICK TO SHARE