कुरुंदा येथे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर संपन्न

सोशल

प्रतिनिधी :अशोक इंगोले (हिंगोली)

वसमत-कुरुंदा:- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुंदा नगरीमध्ये सर्व समाज बांधव सर्व 18 पगड जातीचे माझे मावळे यांच्या वतीने आज कुरुंदा येथे दुर्गा देवी परिसर, स्मशानभूमी असेल आणि गेवराई टोकाई गड यांच्या वतीने आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दोन हजार वृक्षांची लागवड आम्ही आयोजित केलेली आहे आणि आमच्या युवक बांधवांनी आज सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले जे की कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही ते मानवाचे रक्त हे मानवालाच लागतं आणि या उद्देशाने मनोज दादाला एक पुढील भविष्यामध्ये त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातामधून अशी समाजसेवा घडत राहावी अशी आई तुळजाभवानी पाशी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजचे वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन आमच्या कुरुंदा नगरीमध्ये आम्ही आयोजन केले आहे आणि सर्वजण उपस्थित राहिलात त्यानिमित्त सर्वांचे सुद्धा आभार निमित्त करतो आणि मनोज दादाला उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कुरुंदा कुरुंदा नगरीचे सरपंच राजेश पाटील इंगोले यांनी त्यांच्या वृक्ष लागवड व रक्तदान शिबिराच्या सुरुवातीस सांगितले.

CLICK TO SHARE