जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
अंनिस शाखा आरमोरी तर्फे साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विधायक न्यूजचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते विलासजी गोंदोळे होते. माळी समाजाचे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रंजीतजी बनकर व सामाजिक कार्यकर्ता विभा बोबाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापुरुषांच्या केवळ जयंती व पुण्यतिथी साजरी केल्याने समाज परिवर्तन होणार नाही तर त्यांच्या विचारांचे चिंतन झाले पाहिजे असे मत विलासजी गोंदोळे यांनी व्यक्त करून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. थोर समाजसुधारकांच्या कार्याचा समाजाला विसर पडता कामा नये तसेच आपणही त्यांची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत रणजित बनकर यांनी मांडले. अंनिस आरमोरी तालुका अध्यक्ष सुनिता तागवान यांनी महान साहित्यिक व काँम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे वाचन करून त्यांच्या साहित्य संपदेची माहिती दिली. विभा बोबाटे यांनी समाजाला महापुरुषांचा विसर पडला आहे.. व जनजागृती आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिस पदाधिकारी सुजाता अवचट यांनी केले. कोषाध्यक्ष उषा मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अंनिस आरमोरी च्या उपाध्यक्षा योजना मेश्राम, कार्याध्यक्षा शिल्पा मेश्राम, व सदस्या रेशमा रामटेके तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.