पीपीई किटचा सुरक्षित वापर– कृषिकन्यांचे मार्गदर्शन

टेक्नॉलॉजी

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा

वरोरा :- तालुक्यातील सुर्ला गावात आनंद निकेतन कृषी महाविद्यालय,वरोरा यांच्या ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पीपीई किटच्या सुरक्षित वापरावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी गावकऱ्यांना पीपीई किटचा योग्य वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी पीपीई किटमधील हातमोजे, मास्क, गॉगल्स, आणि बूट यांचा योग्य वापर करावा. यामुळे विषारी परिणाम कमी होतात. प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दाखवून पीपीई किटचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण होईल आणि शेतीत अधिक उत्पादनक्षमतेने काम करता येईल. सुर्ला गावातील शेतकऱ्यांनी या प्रक्तशिताचा लाभ घेतला आणि भविष्यात पीपीई किटचा योग्य वापर करण्याचे वचन दिले. आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. तायडे, विषय तज्ञ नितिन गजबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांनींनी आयोजित केला होता. यामध्ये काव्या पडाला, श्रुती पराते, प्रांजली शिंदे, रोहिणी मस्के, तनुजा नंदागवळी, नंदिनी नांदे, फाल्गुनी नन्नावरे, यांचा सहभाग होता. आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी घेतलेल्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी अभिनंदन केले आणि आभार मानले.

CLICK TO SHARE