बनावट दारू आता बियर बार मध्येही

सोशल

प्रतिनिधी:शारुखखान पठाण वरोरा चंद्रपूर

वरोरा :- तालुक्यात जवळपास ८७ ग्रामीण गावे आहे यातील अनेक ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बनावट दारूचा पुरवठा केला जातो परंतु याकडे दारु उत्पादन विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे. तालुक्यात प्रामुख्याने नागरी , चिकणी , मसाळा , बोपापूर , डोंगरगाव , खापरी , टाकळी , टेंमुर्डा , खांबाडा , चिनोरा , आशी , अशा अनेक ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे विक्री पुरवठा होत आहे याबाबत अनेक अनेकदा या वस्तू स्थितीबद्दल अवगत करण्यासाठी वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित करण्यात आली त्यानंतर दारू उत्पादन शुल्काने काल दिनांक 24 नोव्हेंबर रोजी बनावट दारू पुरवठा करणाऱ्या अनिल सिंग अजब सिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी यांना आनंदवन चौकात सकाळच्या सुमारास मुद्देमाला सह अटक करण्यात आली एवढेच नव्हे तर आता चंद्रपूर नागपूर हायवे वर असणाऱ्या एका बियर बार मध्ये काही नागरिक विदेशी दारू पीत असताना त्यांनी बॉटलवरचा क्युआर कोड स्कॅन केला असता “नॉट फॉर सेल” असे दर्शविण्यात आले एकंदरीत वरोरा तालुक्यात देशी विदेशी बनावट दारूची अवैध वाहतूक, विक्री जोरात सुरू असून या प्रकाराकडे पोलीस विभाग, दारू उत्पादन शुल्क हे दोघेही कानाडोळा करीत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या साखळीचा शोध लावतील की आपले हात शेकून घेतील याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

CLICK TO SHARE