संतप्त शेतकरी यांनी जाळला जिल्हाधिकारी यांचा आदेश

सोशल

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा,चंद्रपूर

वरोरा :- सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वा मध्ये आज दीं 24नोव्हे. रोज शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयं वरोरा येथे पीक विमा धारक शेतकरी यांनी दोन तास तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाची दखल कुणीही घेतली नाही म्हणून जिल्हाधिकारी यांचा आदेश जाळून निषेध व्यक्त केला. 100%पीक विमा मिळालाच पाहिजे, जय जवान जय किसान, पालकमंत्री मुर्दाबाद असे नारे देत जो मा जिल्हाधिकारी साहेब यांनी ओरियंटल पीक विमा कंपनी दिलेला आदेशाची होळी करून तहसीलदार साहेब यांचा मार्फत जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हाचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात 100%पीक विमा शेतकरी यांना आठ दिवसात देण्यात यावा अन्यथा तोच आदेश जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जाळू, तसेच पालकमंत्री यांना चंद्रपूर यांना अवगत करू अशा इशारा दिला. या वेळी, श्रीकृष्ण देवतळे, संदीप वासेकर, निखिल तिखट, केशव ताजने, प्रवीण बल्की, आकाश धवणे, नीलकंठ आमटे, डुकरे आशिष , मधुकर ढोके, अविनाश तुळणाकार,किशोर ठेंगणे, मोरेश्वर डुकरे,तसेच शेकडो शेतकरी उपस्थित होते.या आंदोलनाची सुरुवात तुकडोजी महाराज लिखित ग्रामगितेची पूजा करून करण्यात आली.प्रसाशानात सर्व सामान्य जनते सोबत आदराने वागणूक देणारे वरोरा तहसीलदार श्री योगेश कौतकर साहेब तसेच पुलिस विभागात काम पाहणारे राजेश वऱ्हाडे यांचा गुरुदेव सेवा मंडळ आसाळा मार्फत गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मोरेश्वर डुकरे तसेच आंदोलनास सहभागी शेतकरी यांचा मार्फत ग्रामगिता देऊन सन्मान करण्यात आला.

CLICK TO SHARE