जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर :तालुक्यातील कोठारी येथे ओव्हरटेक चा नादात जीव गमावल्याची घटना ४ ऑगस्ट ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.बल्लारपूरकडून गोंडपिपरीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वार बैलबंडी ला ओव्हरटेक करून जात होता. त्यात त्याची दुचाकी स्लीप होऊन डोक्याच्या भारावर पडला. त्यात त्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतक शैलेश दिलीप शेटे (२४) हा गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी चा रहिवासी आहे. बल्लारपूरकडून गोंडपिपरीकडे जाणाऱ्या दुचाकीला एमएच ३३ एए ६५८४ बैलबंडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप झाली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. याची माहिती कोठारी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले.सदर प्रकरणी कोठारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.