शाळेत दारु पिऊन आलेल्या शिक्षकावर कारवाई,कानगाव जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

हिंगणघाट तालुक्यातील कानगाव शाळेत शिक्षक राजू कांबळे दारूच्या नशेत आल्याने खळबळ उडाली होती. शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी दारूच्या नशेत येण्याबाबत शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देवडे यांनी सदर शिक्षक दारूच्या नशेत असल्याची तक्रार व्यवस्थापन समितीकडे केली. त्यांनी शाळेत जाऊन तपासणी केली असता शिक्षिका मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी शाळेत पोहोचून मद्यधुंद शिक्षकाला पोलीस ठाण्यात नेले. यापूर्वीही राजू कांबळे जेव्हा त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार होता तेव्हा शाळेतील अनागोंदी कारभाराबाची तक्रार होती. पुढील कारवाई ठाणेदार प्रफुल डाहूले हे करीत आहे

CLICK TO SHARE