वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

अन्य

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथेआज वेंकटेश्वरा मंगल कार्यालय या ठिकाणी वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जर वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला नाही मिळाली तर मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यां पुढे ठेवणार असल्याचं सौ. प्रीती ताई जैस्वाल यांनी सांगितले नेहमी आघाडीचा धर्म पाळत एकनिष्ठेने आघाडीच्या उमेदवाराचं काम केले पण मार्केट कमिटी ला व कारखान्यावर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता घेतला नाही याची खंत प्रीतीताई यांनी व्यक्त केली, आणि त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्याचं पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे असे प्रीती ताई यांनी सांगितले, कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्षपदी गोविंद गडंबे यांची निवड भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली, तसेच सामाजिक न्याय विभाग हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष काचगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष,सौ. प्रीती ताई जैस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस, प्रशांत गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, अजगर पटेल माजी नगरसेवक हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष, एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष, गोपीनाथ सरोदे, बबलू भाई अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, गोविंद गडंबे सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष, तुकाराम कदम हिंगोली जिल्हा सरचिटणीस, युवराज आवटे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष,कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष, आबा कदम हिंगोली जिल्हा सचिव, कमल सरोदे, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE