शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: जिल्ह्याचे पालकमंत्री जे सदैव सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटत असतात.दिन दुबळ्याला आपलं केंद्रबिंदू ठेवून सदैव राजकारण करतात. त्यांच्या हक्कासाठी झटतात. याच विषयाला केंद्रबिंदू ठेवून आदरणीय ना.सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. या सेवा साप्ताहमध्ये गांधी विद्यालय टेकडी विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल व पोलीस प्रशिक्षण अथलेटिक्स च्या सर्व विद्यार्थ्यांना किट ना.सुधीर मुनगंटिवार चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभहस्ते देण्यात आली.या कार्यामध्ये आदरणीय ना.सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे सर्व सदस्यगण उपस्थित होते.