प्रतिनिधी:हिंगणघाट
हिंगणघाट;- नागपूर जवाहर वसतिगृह येथे ला गुणवंत विध्यार्थ्यां करिता प्रविण्य प्राप्त कौतुकास्पद अवॉर्ड देऊन त्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम विश्वस्थानी आयोजित केला. यावेळी सौं किशोरी नितीन तराळे नवोदय विद्यालय वर्धा यांनी बुद्धिमान, हुशार, अफाट चिकाटी असलेला पण असाह्य, बिकट आर्थिक परिस्थिती पण शिक्षणाची ओढ असलेला साहिल सहारेची बुद्धिमत्ता शिक्षिका यांना माहित झाली हया मुलाचं कौतुक, सन्मान होण्याचे दृष्टीने खूप प्रयत्न केलेत आणि त्यांचे प्रयत्नाला यश आलेत वरील फोटो प्रमाणे सन्मानित करण्यात आलेत, साहिलचा असा सन्मान केला जातो हे माहित नव्हतं. याकरिता जवाहर वसतिगृहाचे मा. गुलाबरावजी जुनूनकर उपाध्यक्ष, श्री अशोकजी खंते,श्री रमेशजी कोसुरकर, विश्वस्थ आदी मान्यवराणी कौतुकानी पुढाकार घेतला, साहीलच्या गुणवतेनुसार CA (चार्टर अकॉउंट )ला प्रवेश मिळाला, नक्कीच भविष्यात CA होणार.कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त मंडळ आदीचे आभार मानले ..