आज पासून रोशन काळे यांचे ग्राम पंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण.

सोशल

थडीपवनी येथील घरकुल मधील घोळ,गावातील 60 घरकुल झाले रद्द.

प्रतिनिधी:विजय सोनुले थडीपवनी

जलालखेडा (त.25) नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील बाबाराव काळे यांचे सन 20-21 मध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर झाले होते. त्याचा करार सुध्दा त्यांनी ग्राम पंचायत मध्ये जाऊन केला होता. त्यानुसार त्यांच्या खात्यात घरकुल चा पहिला हप्ता 15 हजार रुपये बाबाराव यांच्या स्टेट बँकेच्या खात्यात जमा सुध्दा झाला होता. परंतु घरकुल मंजूर होऊन 15 महिने झाल्या नंतर ग्राम पंचायत थडीपवनी यांनी पैसे परत घेण्यासंदर्भात मासिक सभा दिनांक 24/07/2022 ला मासिक सभेत ठराव मंजूर करून गटविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड यांना पाठविला. गटविकास अधिकारी पंचायत समिती नरखेड यांनी घरकुल रिमांड करून जवळपास 60 लाभार्थ्यांचे पैसे परत घेतले. लाभार्थ्यांना तुमचे घरकुल नियमात बसत नसल्यामुळे रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. नियमात बसत नोव्हते तर घरकुल दिले कसे असा प्रश्न लाभार्थ्यांनी विचारला आहे. न्याय मिळावा यासाठी लाभार्थी असलेले बाबाराव काळे यांचा मुलगा रोशन काळे आज पासून ग्राम पंचायत थडीपवनी ग्राम पंचायत समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे. हेतू पुरस्कार घरकुल रद्द करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीनवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मांग नी रोशन काळे यांनी केली आहे.आमरण उपोषण करणार रोशन काळे

CLICK TO SHARE