प्रबोधनात्मक भजन गायन स्पर्धा भारतीय संस्कृती जोपासण्याचे प्रभावी माध्यम -चरणसिंग ठाकूर

सोशल

प्रतीनिधी:साजिद खान नागपुर

काटोल:दि. २६.११.२०२३ जगात अराजगता माजली असून फक्त भारत देशच असा आहे की, ऋषिमुनींनी दिलेल्या संदेशाच्या आधारावर भारतीय संस्कृती आज टिकून आहे. ती अबाधीत राहावी यासाठी अशा लोककलेची आवश्यकता असून समाज प्रबोधनाला भजन गायन स्पर्धा भारतीय संस्कृती जोपासण्याचे प्रभावी माध्यम असून याच माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन मुल्ये जोपासली जावी असे प्रतिवादन कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी केले ते कला गौरव संस्था नागपूरच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाढोणा (नरखेड) येथे कार्तिक गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आज दिनांक 26/ 11/ 2023 ला आयोजित महिला भजन गायन स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलत होतेआराध्य विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजनाने करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र धोटे, प्रा. देविदास कठाने, किशोर गाढवे, आर के राज, दिलेश ठाकरे, डॉ.सौ. संगीताताई बानाईत आणि भागवत बानाईत उपस्थित होते.

CLICK TO SHARE