राष्ट्रवादी युवक कांग्रेस वर्धा जिल्हाच्या वतीने आयोजन.
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट यांचे वतीने वर्धा जिल्हातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेवून 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला,या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती, जिल्हातील ३७८५ शेतकऱ्यांचे ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान २ वर्षापासून रखडले असून त्याची एकूण रक्कम ५६७.७५ लाख इतकी आहे,तर नवीन शेतकऱ्यांची लाभार्थी निवड प्रक्रिया सुद्धा थांबलेली आहे,तर दुसरीकडे शासनाकडून सिंचन विहीर करिता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून येणारे कुशल व अकुशल कामाचे पैसे सुध्दा प्रलंबित आहे,एकीकडे सरकार विविध योजना राबविण्याचे सोंग करत आहेत परंतु शेतकऱ्यांचे सरकार कडे फिरत असलेले पैसै देण्याच नाव मात्र सरकार घेत नाही आहे,सध्या जिल्हातील परिस्थिती बघता ओला दुष्काळ जाहिर करण्याची नितांत गरज आहे,शेतकऱ्यांना निंदन मजुरी,रासायनिक खते,रासायनिक औषधी घेण्याचे पैसे नाहीत तर दुसरीकडे सरकार च अनुदान येईल म्हणून शेतकऱ्यांनी सिंचन करिता लागणाऱ्या विविध वस्तूची केली आहे,त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल आपला “लाडका शेतकरी” असा जिव्हाळा असेल तर सरकारने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे थांबलेले विविध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा माणुसकी दाखवावी,अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक कांग्रेस यांचे तर्फे मा.मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्फत देण्यात आले यावेळी,जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत,समीरजी देशमुख,संदीपजी किटे राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रणय कदम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सचिनजी पारसडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, आशिष रत्नमाला नरेश लोखंडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिवराज शिंदे, वर्धा विधानसभा अध्यक्ष मिलिंदजी हिवलेकर, जिल्हा उपाध्यक्ष चेतन चोरे,जिल्हा उपाध्यक्ष गुरुदयाल सिंग जुनी ,अमर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष ,मां.तेलंग सर, मां.प्रा.खतीब सर,मां.मुन्ना भाऊ झाडे,प्रा.प्रवीण पेठे सर,सचिन शेगावकर, आकाश दाते, सचिन ठाकरे, अर्चित निगडे प्रवीण डहाके,नामदेव खानझोडे, सागर गजभिये, मोहन विंचूरूकर रितेश बोन्दरकर, विकास गोठे, दिनेश गुळघाणे,विवेक नरड,पवन जयपूरकर,अजय निमसडकर तसेचमोठ्या संख्येने शेतकरी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.