जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा काळीमाती येथे दिनांक 8 ऑगस्ट 2024 ला शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचित पालक सभा उत्साहात संपन्न

अन्य

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव: काळीमाती येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत दिनांक 8 ऑगस्ट 2024 ला शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचित पालक सभा संपन्न झाली. शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचित पालक सभा सरपंच सौ.शीलाताई पुरुषोत्तम चुटे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपसरपंच श्री. प्रशांत बहेकार, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष.श्री हरिरामजी फुंडे व शाळेतील पालकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत श्री.कृष्णकुमारजी मेहर यांची अध्यक्षपदी तर सौ.योगिता संजय मुनेश्वर यांची उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सौ.लक्ष्मी अनिल फुंडे, सौ.कविता कवींद्र फुंडे, श्री सोमेश्वरजी कोरे, सौ.वंदना छेदीलाल पाथोडे, सौ.त्रिवेणी रमेश सिंदराम, श्री किशोरजी गणवीर व दिनेशजी फुंडे यांची निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना पालकसभेत प्रास्ताविक शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री. जी.टी.रहांगडाले सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुकुंद डोबनेऊके सर व आभार मुकेश हरिणखेडे सर यांनी मानले.निवड प्रक्रियेमध्ये कु. जी.डी.भाकरे, श्री.आनंद सरवदे, श्री.एन.जी. कांबळे,श्री.डी.के.मेंढे व कु.कविता महादुले यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE