भवभूती शिक्षण संस्थेतील कोट्यावधींची जमीन कुटुंबियांच्या नावाने विक्री पत्र करून त्यांची पुन्हा विक्री केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे

क्राइम

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगाव: गोंदिया जिल्ह्यात धर्मदाय आयुक्त यांच्या नियमांची पायमल्ली करण्यात आले.तर घटना बाह्य कार्यकारी मंडळाचे हे उघडपणे भ्रष्ट्राचार केल्याचे समोर आले आहे.आता या प्रकरणात काही आजीव सदस्य यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था नोंदणी क्रमांक ५६/६२ येथील घटनाबाह्य संचालक मंडळाने संस्थेच्या विविध जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक भ्रष्ट्राचार केला असल्याचे उघड झाले आहे.या जमीन विक्रीची तक्रार होताच आता विक्री केलेल्या जमिनी परत संस्थेच्या नावाने पुन्हा खरेदी व्यवहार केल्याचे दस्त उघड पडले आहे.त्यामुळे या जमिनीवरील भूखंड खरेदी करणाऱ्या अनेक वेक्तींमध्ये एकच खळबळ माजली आहे.आमगाव येथील भवभूती शिक्षण संस्था आमगाव येथील संचालक मंडळाने धर्मदाय आयुक्त यांच्या विना परवानगीने संस्थेची अनेक जमिनी अवैधपणे विक्री करून आर्थिक लाभ घेतला आहे.भवभूती शिक्षण संस्था आमगाव यांची मौजा पदमपुर, बनगांव तालुका आमगाव येथील संस्थेच्या जमीनी संस्थेच्या संचालक मंडळाने परस्पर संगनमताने आर्थिक लाभ उचलण्यासाठी परस्पर विक्री व्यवहार केले आहे.संस्थेच्या काही जमिनी परस्पर कुटुंबातील वेक्तींच्या नावाने विक्री पत्र लिहून संगनमताने वळविण्यात आले आहे. तर काही जमिनी सरळ विक्री पत्र करून विक्री करण्यात आले आहे.यात चार विक्री पत्र महेंद्र हेतराम पारधी ,विनोद पालिराम रहांगडाले, रेवेंद्र इंसाराम बिसेन,राहुल भैयालाल कटरे राहनार तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया यांना सलग ६८ लक्ष, १८०००० एक लाख अंशी हजार तर दोन जमिनी प्रत्येकी २१- २१ लक्ष रुपये किंमतीत विक्री पत्र लिहून देण्यात आले.सदर संस्थेच्या जमिनी विक्री करताना धर्मदाय आयुक्त यांच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. याबाबद काही आजीव सदस्य यांना माहिती होताच त्यांनी सहायक धर्मादाय आयुक्तनागपूर व सहाय्यक धर्मादाय आयुक्त गोंदिया यांच्याकडे तक्रार व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले आले.त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली. त्यांनी यातून मार्ग काढताना सदर मौजा पदमपुर येथील एक गटातील जमीन सदर विक्री पत्र रद्द करून संस्थेच्या नावाने खरेदी करण्यात आले.तर उर्वरित अद्याप रद्द करण्यात आले नाही. विशेष म्हणजे संचालक मंडळाने जाणीवपूर्वक या जमिनी परस्पर विक्री करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी संस्थेच्या अनेक जमिनी अद्यापही संस्थेच्या अनुसूची १ मध्ये नोंद करण्यात आले नाही. व त्या जमिनी परस्पर विक्री व्यवहार करण्यात आले आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने सर्वांची झोप उडाली आहे. तर संस्थेच्या जमिनी परस्पर विक्री व्यवहार केल्याबद्दल फौजदारी कारवाई करण्यात यावी करिता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.तर सहायक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CLICK TO SHARE